विठ्ठलवाडीतील कु. अनघा विजय दोडके झळकली शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत
अनघा न. प. शाळा क्र. 7 ची विद्यार्थीनी
जब्बार चीनी, वणी: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज न. प. शाळा क्र. 7 ची विद्यार्थीनी कु. अनघा विजय दोडके ही इयत्ता 5 वीमध्ये घेतल्या जाणा-या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत झळकली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. अनघा ही सध्या 6 व्या वर्गात शिकत असून 5 व्या वर्गात असताना फेब्रुवारी 2020 मध्ये तिने शिष्यवृत्तीची परीक्षा दिली होती. त्याचा आता निकाल आला असून तिने गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शिष्यवृत्ती मिळवली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तिला वर्ग शिक्षिका मंगला पेंदोर यांचे मार्गदर्शन लाभले.
कु. अनघा ही सामाजिक क्षेत्रात कायम अग्रेसर असलेल्या विजय दोडके यांची मुलगी आहे. विठ्ठलवाडीत राहणारी अनघाने आता पर्यंत शाळेत कायम सर्वोच्च स्थान पटकवले आहे. याशिवाय डान्स, वकृत्व (भाषण), रांगोळी, चित्रकला या कलेतही ती निपून आहे. या स्पर्धांमध्येही तिने अनेक बक्षिसं मिळवली आहे.
शैक्षणिक कार्यसह विद्यार्थ्यांच्या इतर ऍक्टिव्हीटीसाठीही कायम प्रयत्नरत असणारी शाळा म्हणून नगर परिषद शाळा क्रमांक 7 ची ओळख आहे. शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी शाळेतील शिक्षकांतर्फे संध्याकाळी 4 नंतर एक तासाचे विशेष कोचिंग दिले जाते. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचे परिश्रम यामुळे दरवर्षी या शाळेतील विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकत आहे.
यावर्षी हा बहुमान कु. अनघाने मिळवला आहे. अनघा आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक वसंतराव गोरे, वर्ग शिक्षिका मंगला पेंदोर यांच्यासह आई निशा दोडके, वडील विजय दोडके आणि शिक्षक गणेश मोहुर्ले यांना देते. तिच्या या यशाबाबत परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हे देखील वाचा: