अनिल ताजने झाले चिखलगावचे उपसरपंच

पोटनिवडणुकीत रुपाली कातकडे यांचा पराभव, कातकडे गटाला धक्का

जितेंद्र कोठारी, वणी: चिखलगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी आज झालेल्या पोटनिवडणुकीत अनिल ताजने यांची उपसरपंच पदी निवड झाली. अनिल ताजने यांनी आपले विरोधी उमेदवार रुपाली सुनील कातकडे हिचा 3 मतांनी पराभव केला. या पराभव कातकडे गटाला धक्का समजला जातोय.

Podar School 2025

राजकीयदृष्ट्या महत्वाची असलेल्या चिखलगाव ग्राम पंचायतचे उपसरपंच अमोल रांगणकर यांच्या मृत्यू झाला होता. त्यामुळे मागील अनेक महिन्यापासून हे पद रिक्त होते. निवडणूक विभागाने 2 सप्टेंबर रोजी उपसरपंच पदाची निवड करण्याची सूचना निर्गमित केली होती. त्या अनुषंगाने गुरुवार 2 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय चिखलगाव येथे मतदानासाठीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला सर्व 15 सदस्य हजर होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

उपसरपंच पदाकरिता रुपाली कातकडे व अनिल ताजने यांनी नामांकन दाखल केले होते. मतदानाकरिता बॅलेट पेपर पद्दतचे वापर करण्यात आले. मतदाननंतर लगेच मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीत रुपाली कातकडे हिला 6 मत मिळाले तर अनिल ताजने यांना 9 मते मिळाले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रशेखर आकुलवार यांनी अनिल ताजने याना विजयी घोषित केले.

‘श्रीमंत’ ग्रामपंचायत म्हणून ओळख
चिखलगाव हा वणी पंचायत समितीचे सभापती भाजपचे संजय पिंपळशेंडे व इंदिरा सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष शिवसेनेचे सुनील कातकडे यांचा गाव आहे. त्यामुळे या निवडणुकीवर सर्वांचे लक्ष होते. आर्थिकदृष्ट्या सबळ ग्रामपंचायत म्हणूनही चिखलगाव ग्रामपंचायतीकडे बघितले जाते.

हे देखील वाचा:

Comments are closed.