मित्रांमध्ये झाला वाद, एकाला मारहाण

वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: मित्रांमधील शुल्लक वाद वाढून दोघांनी एका तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण केली. शनिवारी 24 डिसेंबर रोजी ही घटना घडली. जखमीला उपचारासाठी चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. होते. उपचार करून परत आल्यावर याबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. 

फिर्यादी नितीन अरविंद उकणकर (39) हा टागोर चौक येथील रहिवासी असून तो मजुरीचे काम करतो. त्याची आरोपी अखिल शेख (50) व शकील शेख (40) दोघेरी रा. खरबडा वणी यांच्यासोबत ओळखी आहे. नितीन उकणकर हा त्यांच्या मित्रासोबत चंद्रपूरला जात होता. दरम्यान नितीनचा व आरोपींचा वाद झाला. त्यानंतर नितीन हा हायवेवरील साहील बार समोर असताना तिथे आरोपी पोहोचले. त्यांनी नितीनला ब्राह्मणी फाट्याजवळ वाद का घातला असे म्हणत नितीनला लाकडी दांढ्याने मारहाण केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मारहाण होताना पाहून नितीनचा मित्र सोडवण्यासाठी गेला असता त्याला देखील आरोपींनी मारहाण केली. या मारहाणीत नितीनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. सोमवारी रुग्णालयातुन सुट्टी मिळाल्यानंतर नितीनने वणी ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली

तक्रारीवरून वणी पोलिसात अखिल व शकील यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम 324, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास विठ्ठल बुरेवार करीत आहे.

हे देखील वाचा: 

Comments are closed.