शुल्लक वादावरून एकास फावड्याच्या दांड्याने मारहाण

वणीतील फुकटवाडी येथील घटना

सुनिल इंदुवामन ठाकरे, वणी: नालीचे पाणी काढण्यावरून झालेल्या शुल्लक वादातून एका इसमाने दुस-या इसमास मारहाण व शिविगाळ केली. फुकटवाडी येथे ही घटना घडली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारी नुसार, मनोज सूर्यभान गायकवाड (44) हे जनता शाळेच्या मागील फुकटवाडी या परिसरात राहतात व मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घरा शेजारी राजू गायकवाड (36) राहतो. राजूला दारू पिण्याची सवय असून तो नेहमी मनोज यांना दारू पिऊन शिविगाळ करायचा. दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास राजूने घरासमोरील नाली काढून त्यातील घाण पाणी व कचरा मनोजच्या घरासमोर टाकला. त्यावर मनोज यांनी राजूला हटकले असता राजू चिडला.

राजूने शिविगाळ करत नाली काढण्याच्या फावड्याच्या दांड्याने मनोजला मारहाण केली. यात त्यांच्या हाताला व पायाला इजा झाली. तसेच यापुढे वाद घातल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. दरम्यान मनोज यांच्या पत्नीवर चंद्रपूर येथे उपचार सुरू होता. पत्नीवर उपचार करून परत आल्यावर त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठून राजू गायकवाड विरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तक्रारीनुसार आरोपी विरोधात भादंविच्या कलम 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

Breaking News: वाघाचा वेकोलि कर्मचा-यावर हल्ला, कामगार जखमी

अल्पवयीन मुलीचे लावले लग्न, मुलीच्या आईला अटक

Comments are closed.