सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोंसा परिसरात ठाणेदार अजित जाधव आपल्या कर्माचा-यासह नाकाबंदी दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना दारू विक्रीची पोलिसांना माहिती मिळाली. त्यावरून ठाणेदार जाधव व कर्मचारी सहायक फौजदार सकवान व संजय खांडेकर हे एक लाईटच्या उजेडाखाली पोलीस गाडी थांबवून होते.
दरम्यान घोन्शाकडून बोर्डाकडे दुचाकीने एक इसम 11.30 वाजता आला असता त्याची तपासणी केली व नाव विचारले असता त्याने सागर अशोक चौधरी वय 25 रा. माळीपूरा वणी असे सांगितले व झडती घेतली असता. पांढऱ्या रंगाचे प्लास्टिक थैलीत देशी दारूच्या 180 मीलीच्या 144 शिष्या 8 हजार 640 व 90 मीलीच्या 100 शिष्या किंमत 3 हजार असा एकूण 11 हजार 889 व दुचाकी होंडा ऍक्टिवा क्र MH 29, BQ 8919 किंमत 70 हजार असा एकूण 81 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून व आरोपीला अटक केली व ठाण्यात आणले.
मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पकडण्यात आलेली दारूच्या पेट्या कोणत्या परवाना देशी ड्रीऊच्या दुकानातील आहे हे सुद्धा शोधणे गरजेचे झाले असून त्या परवाना देशी दारू दुकान मालकवरही गुन्हे दाखल करणे आवश्यक झाले आहे. सदर कार्यवाही ठाणेदार अजित जाधव यांच्या सह सहाय्यक फौकदार सकवान व संजय खांडेकर यांनी केली.
8 जुलै रोजी मुकुटबन रुईकोट मार्गावर अवैध देशी दारू विक्री सुरू होती . पोलीस स्टेशन परिसरात पोलिसांची नाकाबंदी ड्युटी चालू असताना फोनद्वारे गुप्त माहिती बुसस्टँड मार्गावर देशी दारूच्या शिष्या बाळगून विक्री सुरू आहे. अश्या माहितीवरून पोलीस पोहचले असता रघु काशीनाथ चट्टे वय 45 वर्ष रा मुकुटबन याच्या जवळ 180 मिलीचे 65 शिष्या किंमत 3 हजार 900 चा मुद्देमाल मिळून आला.
पोलिसांनी मुबई दारूबंदी कायदा 65 ई अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रंजना सोयाम करीत आहे. मुकुटबनला नवीन पदभार संबळणारे ठाणेदार अजित जाधव यांनी अवैध धंदेवाल्याच्या विरोधात सुरू केल्या कार्यवाहीचे स्वागत होत आहे. तर अवैध धंदेवाल्यांचे दाबे चांगलेच दणाणले आहे.
हे देखील वाचा:
पोलिसांचे नवीन सुंदर’कांड’, बडग्याच्या कोंबडबाजारासाठी ऍडव्हांस बुकिंग?
अवघ्या 3 हजारांमध्ये प्ले गृप, नर्सरी, यूकेजी, एलकेजीसाठी प्रवेश निश्चित