आस्तिक रोहणकरचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

शिंदोला येथील माऊंट कॉरमेल कॉन्व्हेंटचा विद्यार्थी

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिंदोला येथील माऊंट कॉरमेल कॉन्व्हेंट मधील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी आस्तिक रणवीर रोहणकर याने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. तो शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र ठरला आहे. आस्तिक हा शिंदोला येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणवीर रोहणकर यांचा मुलगा आहे. तो आपल्या यशाचे श्रेय शिक्षक आणि आईवडिलांना देतो. मित्र परिवारांच्या वतीने आस्तिकला पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रवीण मेश्राम, राजू निमकर, राजेन्द्र गोरे, राकेश चौधरी उपस्थित होते.

Comments are closed.