जैन ले आऊट मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

तालुका प्रतिनिधी, वणी: येथील जैन ले आऊट मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शनिवार आणि रविवारला विविध कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी गुरुदेव सेवा मंडळाचे मारोतराव ठेंगणे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रसंतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गुरुकुंज मोझरीचे रविदादा मानव यांचे व्याख्यान पार पडले. नंतर सप्तखंजिरी वादक संदीपपाल महाराजांचे कीर्तन झाले. भजन संमेलनात परिसरातील भजन मंडळांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक उमाकांत म्हसे यांनी तर संचालन दत्तू महाकुलकर यांनी केले. आभार मोहन वैद्य यांनी मानले. यशस्वीतेसाठी मनोहर मत्ते, विलास वांढरे, निखिल खाडे, मधुकर खिरटकर, महादेव कावरे, पंढरी दोरखंडे आदींनी परिश्रम घेतले.

Comments are closed.