प्रतिशोध घेण्यासाठी तरुणावर रॉड व काठीने हल्ला

तीन महिन्यानंतर टोळीचा प्रतिशोध... हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: रात्री मित्रासह चहा पित असताना एका तरुणावर काही तरुणांनी लाठी व दगडाने प्राणघातक हल्ला केला. बुधवारी दिनांक 4 मे रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हरीष उर्फ ठिका संजय रायपुरे (वय 19 वर्ष) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्री पहाटे 3 वाजताच्या सुमारास त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती आहे. जखमीच्या आईच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Podar School 2025

तक्रारीनुसार जखमी हरीष हा दामलेनगरातील रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वी हरीषचा सेवानगर येथील काही तरुणांशी वाद झाला होता. रात्री 10 वाजताच्या सुमारास हरीष हा यवतमाळ रोड वरील राम शेवाळकर परिसरात चहा पित होता. दरम्यान तिथे काही तरुण मोटरसायकल घेऊन घटनास्थळी पोहोचले व त्यांनी हरीष याला लाठी, दगडाने मारहाण केली. मारहाण केल्यावर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हरीष जखमी अवस्थेत घटनास्थळी होता. हल्लेखोर निघून गेल्यावर दामले नगर येथील काही तरुणांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच जखमीच्या आईने पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तक्रारीवरून 4 संशयीतांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 324, 34 व 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकऱणाचा तपास हे.कॉ. विठ्ठल बुरेवार करीत आहे.

हल्ल्याला पूर्व वैमनस्याची पार्श्वभूमी
जखमी हरीष उर्फ ठिक्या रायपुरे याचा सेवानगर येथील काही तरुणाशी काही महिन्याआधी वाद झाला होता. या वादातून 7 फेब्रुवारी रोजी हरीषने सेवानगर येथील तरुणावर चाकूने हल्ला केला होता. या प्रकऱणी हरिषला अटक झाली होती. या प्रकऱणी 15 दिवसांआधीच तो जामिनावर सुटला होता. त्यामुळे आधी झालेल्या हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठीच हल्ला करण्यात आला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.   

हे देखील वाचा:

वणीत प्रोफेशनल मेकअप व हेअर स्टायलिंग वर्कशॉप

Comments are closed.