भास्कर राऊत, मारेगाव: ऑटो चालकाने स्वतःच्या घरात पेट्रोल टाकून जाळून घेतले. ही घटना पांढरकवडा (लहान) येथे घडली. मृत व्यक्तीचे नाव अनुप अरविंद आस्वले वय 26 वर्षे आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.
सविस्तर वृत्त असे की, अनुप अरविंद आस्वले हा ऑटो चालक होता. तो नेहमी पांढरकवडा (ल) ते मारेगाव या रस्त्याने ऑटो चालवायचा. आज दि. 4 फेब्रुवारीला दुपारी तो एकटाच घरी होता. त्यांचेवर नेमके कोणते संकट होते याचा काहीही थांगपत्ता कोणालाही नव्हता. त्याने दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले.
घरातून धूर निघत असल्याने गावातील काही मंडळी त्याठिकाणी जमा झाली. नंतर मृतकाच्या भावाला शेतातून बोलावले. दरवाजा काढून बघितले असता अनुप हा 80 टक्के जळलेला होता. तालुक्यात आत्महत्यांच्या घटना सतत घडत असतांना आज मात्र तालुक्यासाठी शुक्रवार हा घातवार ठरल्याची चर्चा तालुक्यात सुरू होती. आज दोन अपघात तर एक आत्महत्या झाल्याने तालुक्यावर शोककळा पसरलेली आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.
हे देखील वाचा:
Comments are closed.