बहुगुणी डेस्क, वणी: सध्या तालुक्यात घरफोडी आणि दुचाकी चोरीचे सत्र सुरुच आहे. पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला लावलेली दुचाकीही चोरट्याने सोडली नाही. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत सांवगी (नवीन) येथे दिनांक 27 मे रोजी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अमन अनिल निमगळे (28) हा मुळचा नागपूर येथील रहिवासी असून तो मारेगाव येथील जिओ स्टोअऱमध्ये स्टोअर मॅनेजर म्हणून काम करतो. त्याच्याकडे होन्डा कंपनीची ऍक्टिव्हा (MH49- BP-0287) ही दुचाकी आहे. कंपनीच्या कामासाठी तो ही मोपेड वापरतो. दिनांक 27 मे रोजी तो दुपारी 1 वाजताच्या सुमारास टेक्निशिअनला सोबत घेऊन तो दुचाकीने शिंदोला कॉलोनी येथे वायफाय जोडण्यासाठी गेला होता.
दरम्यान रस्त्यात त्याला दुचाकी पंक्चर झाल्याचे लक्षात आले. दरम्यान मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे त्याने दुचाकी सावंगी (नवीन) गावाजवळील रस्त्याच्या कडेला लावली. त्यानंतर कस्टरमला बोलवून ते दोघेही दुपारी 4 वाजताच्या सुमारास कस्टमरच्या दुचाकीने शिंदोला येथे गेले. वायफाय लावल्यानंतर रात्री 8 वाजताच्या सुमारास ते दोघेही दुचाकी ठेवलेल्या ठिकाणी परत आले. मात्र अमनला त्याची दुचाकी आढळली नाही.
त्याने तेव्हापासून एक आठवडा दुचाकीचा शोध घेतला मात्र दुचाकीचा शोध लागला नाही. अखेर त्याने शिरपूर पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 303 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
Comments are closed.