खा. बाळू धानोरकर यांची पाटण व झरीतील कोविड सेंटरला भेट
रुग्णाकरिता ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा वाढवण्याची ग्वाही
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी तालुक्यातील पाटण व झरी येथील कोविड सेंटरला 5 मे रोज सकाळी 9.30 वाजता भेट दिली. कोविड सेंटर मधील रुग्णाची पाहणी केली. रुग्णाची विचारपूस करून होणाऱ्या गैरसोय बाबत विचारणा केली. झरी नगरपंचायत कोविड सेंटर मधील रुग्णांनी खासदारांजवळ वेळेवर जेवण मिळत नाही, तीन- तीन साफसफाई केल्या जात नाही, बेडशीट बदलल्या जात नाही व इतर समस्या सांगितल्या.
तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य विभागात कर्मचाऱ्याची पदे रिक्त असल्याने रुग्णांना सेवा देण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णाची वाढती रुग्णसंख्या पाहून झरी येथील नगरपंचायत व पाटण येथील नवीन बांधकाम झालेल्या रुग्णालयात कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे. दोन्ही कोविड सेंटर मध्ये रुग्ण भरती आहे.
खासदार धानोरकर यांनी आरोग्य कर्मचारी तसेच औषध साठा आरोग्य विभागात होणाऱ्या अडचणी बाबत संपून माहिती घेतली. आरोग्य विभागाच्या समस्या सोडविण्याचे आस्वासन दिले तसेच याबाबत आरोग्य विभागाचे (सीएस) सिव्हिल सर्जन व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून समस्या सोडविणार असल्याचे सांगितले.
खासदार धानोरकर नगरपंचायतमध्ये दाखल होताच त्यांना परिसरात कचरा आढळला. त्यावर ते खूप संतापले व उपस्थित असलेल्या कर्मचारी याना चांगलेच धारेवर धरले. अस्वच्छता आढळल्यास तुमची खेर नाही व दररोज साफसफाई करून रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा आदेश दिला.
MP
मध्यवर्ती बँकेचे संचालक राजू येल्टीवार यांनी खासदार धानोरकर यांच्याकडे तालुक्यात 20 ऑक्सिजन बेडची प्रमुख मागणी केली. कारण गरीब व आदिवासी जनतेला ऑक्सिजन बेड नसल्याने 40 किमी असलेल्या पांढरकवडा येथे रेफर करण्यात येते. त्यामुळे गोरगरीब व आदिवासी लोकांच्या जीवित्वास धिका निर्माण होतो तसेच आर्थिक भुर्दंड सुद्धा भोगावे लागत आहे. तरी ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्याची मागणी येल्टीवार यांनी केली.
खासदार यांच्यासोबत माजी आमदार वामनराव कासावार, मध्यवर्ती बँकचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे,राजीव येल्टीवार, मेडिकल ऑफिसर माने, ओम ठाकूर, राहुल दांडेकर, शेखर बोनगीरवार उपस्थीत होते.
हे देखील वाचा: