गॅस सिलेंडर स्फोटप्रकरणी बांगडे परिवाराला मिळाला न्याय

एच.पी.गॅस कंपनी कडून मिळाली दोन लाखाची नुकसान भरपाई,,,

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रंगारीपुर येथील उल्हास कृष्णराव बांगडे यांच्या घरी दिनांक 24 फ्रेब्रुवारी 2020ला दुपारी गॅस सिलेंडर स्फोट झाला होता. त्यात घरघुती वापरातील वस्तू जळाल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर रवी सेल्स एजन्सीच्यावतीने नुकसान भरपाई मिळण्याकरिता प्रयत्न केले. आणि आज एच.पी.गॅस कंपनीच्या वतीने दोन लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचा धनादेश बांगडे यांना देण्यात आला.

बांगडे यांच्या घरीरातील गॅस सिलेंडर गळतीमुळे स्फोट झाला. यात गॅस, फ्रीज, कपाट, केंट(आर.ओ), मॉड्युलर किचन, मिक्सर, LED टीव्ही(42 in), कुलर इत्यादी घरगुती वापरातील वस्तू जळून नुकसान झाले होते. मात्र एक चांगली गोष्ट की कुठलीही जीवित हानी झाली नव्हती.

झालेल्या नुकसानावर बांगडे कुटुंबीयांयाच्या वतीने रवी सेल्स एजन्सी येथे तक्रार करण्यात आली. एजन्सीच्या वतीने एच.पी.गॅस कंपनीला घटनेची माहिती दिली असता कंपनीच्या वरीष्ठ विक्री अधिकारी विशाल सूर्यवंशी द्वारा पाहणी व पंचनामा करण्यात आला.

मात्र रवी सेल्स एजन्सीचे संचालक रवींद्र निखार यांनी सातत्याने प्रयत्न करीत तब्बल 14 महिन्यानंतर बांगडे कुटूंबियांना अखेर दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळवून दिली. दोन लाख रुपयांचा धनादेश बांगडे कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले.

हेदेखील वाचा

राजेंद्र करमनकर यांचे निधन

हेदेखील वाचा

गंगाधरराव बोर्डे यांचे निधन

हेदेखील वाचा

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.