अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले

आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिलई येथील अल्पवयीन मुलीला गावातीलच युवकाने फूस लावून पळवून नेले. या संबंधी मुलीच्या वडिलांकडून तक्रार देण्यात आली आहे. सध्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन धगडी (२६) याने ६ महिन्यांपूर्वी गावतीलच एका मुलीसोबत लग्न करतो, अशी मागणी मुलीच्या वडिलांसोबत केली होती. परंतु मुलीच्या वडिलांनी लग्नास नकार दिला. २९ ऑगस्ट रोजी मुलगी सकाळी ६ वाजता मुकुटबन येथे कॉलेजला जाते म्हणून गेली. सायंकाळी उशिरापयंर्त घरी न परतल्याने नातेवाईकांकडे शोधाशोध केली. मात्र मुलीचा शोध लागत नसल्याने वडिलांची शंका गजाननवर आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तो देखील गावात नव्हता. त्यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवताच त्यांना गजानन हा बोरगाव येथे असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पीएसआय नितीन चुलपार यांनी गजाननला बोरगाव येथील बहिणीच्या घरून अटक केली. तर मुलीला तिच्या आत्याच्या घरून आणण्यात आले.

या प्रकऱणी आरोपी गजानन धगडीवर ंभांदवि 366, 363, 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पीएसआय नितीन चुलपार करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.