सुशील ओझा, झरी: तालुक्यात भारत बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचेदेखील याला समर्थन मिळाले. तालुक्यातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष व सामाजिक संघटनांनी मुकुटबन, पाटण व झरी येथील मुख्य बाजारपेठ बंद करून निषेध नोंदविला. शेतकऱ्यांवर लादलेल्या अटी रद्द कराव्यात. अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने शेतकरीविरोधी धोरणाचा अवलंब करून देशोधडीला लावण्याचे काम करीत असल्याचा आरोप करीत संपूर्ण देशात आंदोलन व चक्काजाम करण्यात आले. शेतकरीविरोधी कायद्याच्या विरोधात संपूर्ण भारत बंदचे आवाहन करण्यात आले. शेतकऱ्यांना न्याय देण्याकरिता विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना एकवटले.
यावेळी शिवसेनेचे चंद्रकांत घुगुल, संतोष माहुरे, सतीश आदेवार, विनोद उप्परवार, संदीप विचू, काँग्रेसचे भूमारेड बाजनलावार, राजीव येल्टीवार, प्रकाश म्याकलवार, संदीप बुरेवार, नीलेश येल्टीवार, हरिदास गुर्जलवार, राहुल दांडेकर, भूमरेड्डी एनपोतुलवार, नरेंद्र गेडाम, बापूराव जिंनावार, रवींद्र तिपर्टीवार, अमोल आवारी उपस्थित होते.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा