भेंडाळा उच्च प्राथमिक शाळेत वृक्षारोपण.

0

सुशील ओझा, झरी : तालुक्यातील भेंडाळा येथील उच्च प्राथमिक शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्र हिरवेगार करून पर्यावरण संतुलित करण्याच्या उद्देशाने १३ कोटी वृक्ष लावण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने तालुक्यात शासकीय, निमशासकीय व सामाजिक संघटनाही वृक्ष लागवड करीत सरसावले आहे. भेंडाळा जिल्हा परिषद शाळेतही सरपंच लिनेश सातपुते, श्याम बोदकुरवार, सुरेश मानकर, बंडू कोहळे, डॉ. गोडे व शिक्षकवृंदानी वृक्षारोपण केले..

.

Leave A Reply

Your email address will not be published.