अयाज शेख, पांढरकवडा: केळापूरच्या जगदंबा मंदिरासमोर बसून भिक्षा मागणाऱ्या वृद्ध महिलांची ओटी भरून, साडी, चोळी व मास्क देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नागोराव भनारकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेतला.
भनारकर हे भोई समाज युवा मंचाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष आहेत. ग्राहक प्रहार संघटनेचे तालुका प्रचार प्रमुख व युवा फाउंडेशन केळापूरचेही अध्यक्ष आहेत. सामान्य परिवारातून सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे ते कार्य करतात.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र परिवार यांच्याकडून एक छोटासा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. त्या निमित्त ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर, अभय निकोडे, बापू पारशिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. केळापूर येथील मित्र परिवार, पत्रकार गणेश अनमुलवार, रोशन मसराम,
विजय कोहचाडे, सूरज पाटील, आकाश वहिले, अजय शिवरकर, आशू चव्हाण, अभी तोडसाम, नितीन मडावी, उमरी येथील सहकारी नीलेश विभिडकर, नीरज गुरनुले, प्रेम कोहळे, संतोष पेंदोर हे उपस्थित होते. विश्वस्त मंडळाचे काशिनाथ शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्रसाद नावलेकर, अभय कोडे, डॉ. नीलेश परचाके, राम जिड्डेवार, नीलेश विभिडकर, नीरज गुरूनले आदींनी प्रदीप भनारकर यांचा वाढदिवस आगळा वेगळा साजरा केल्याने परिसरात कौतुक होत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)