ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे किशोर मोघे यांचा सत्कार

जैताई मंदिर समितीने घेतली कामांची दखल

0

जितेंद्र कोठारी, वणी: ग्रामीण भागात विविध प्रकारच्या समस्या दूर करणे व गावातील लोकांचे बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने निर्मित ‘ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट’च्या कामांची जैताई मंदिर समितीने दखल घेतली.

मंदिर समितीतर्फे शनिवार दि. 24 ऑक्टोबररोजी जळका, ता.मारेगाव येथील संस्थेच्या कार्यालयात जाऊन संस्थापक डॉ. किशोर मोघे यांच्या शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी ट्रस्टला 5000 रुपयांची देणगीही मंदिर समितीतर्फे देण्यात आली.

नवरात्रौत्सव दरम्यान निस्वार्थ समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान करण्याचे उपक्रम जैताई मंदिर समितीतर्फे राबविण्यात येत आहे. यावेळी सत्कारमूर्ती किशोर मोघे यांसह मंदिर समितीचे बाळासाहेब सरपटवार, नरेंद्र नगरवाला, किशोर साठे, मुन्ना पोतदार, नामदेव पारखी, मयूर गोयनका, देवेंद्र पोल्हे व संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन देवेंद्र पोल्हे यांनी केले. तर आभार नहाते यांनी मानले.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.