काळे ले आउट मध्ये रस्त्याच्या बांधकामाचे भूमीपूजन

रस्त्याच्या कामासाठी आमदार निधीतून 25 लाखांचा निधी

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी शहरातील जैन ले आउट समोरील काळे ले आउट मध्ये समृद्धी अपार्टमेंट समोर आमदार विकास निधी अंतर्गत 25 लाखांच्या दोन रस्त्याचे भूमीपूजन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, पंचायत समितीचे सभापती संजय पिंपळशेंडे, नगर सेवक धनराज भोंगळे व मंजुषा झाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी या आधी काळे ले आउट मधील नाल्यांच्या बांधकामासाठी 15 लाख देऊन आधी सर्व नाल्यांचे बांधकाम पूर्ण करून घेतले होते. त्यानंतर या ले आउट मधील रस्त्यांच्या बांधकामाला सुरुवात केली आहे.

पहिल्या टप्प्यात दोन डांबरी रस्त्यासाठी आमदार निधीतून 25 लाख रुपये देण्यात आले. पुढील टप्प्यात या ले आउट मधील रस्त्यासाठी अधिक 40 लाख रुपये देणार असल्याचे घोषणा आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केली आहे.

या प्रसंगी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे म्हणाले की शहरातील रस्ते विकास आमदार बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनात गेल्या चार वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. तर संजय पिंपळशेंडे यांनी वणी नगर परिषद क्षेत्रात आमच्या कार्यकाळात सर्वाधिक रस्ते निर्माण झाले आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

हे देखील वाचा:

वागदरा येथे कोंबडबाजारावर पोलिसांची धाड

वाघाच्या हल्ल्यात 2 बैलांचा मृत्यू, चिंचघाट शिवारातील घटना

Leave A Reply

Your email address will not be published.