पुरुषोत्तम नवघरे, वणी: मंगळवारी वणीत भव्य सायकल रॅली काढण्यात आली. 17 हजार किमीची सायकलने भ्रमंती केलेल्या प्रणाली चिकटे हिच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण वाचवण्याचा संदेश घेऊन या रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत 100 पेक्षा अधिक जणांनी सहभाग घेतला होता. पर्यावरण प्रेमी, विद्यार्थी तसेच विविध संस्थेच्या स्वयंसेवक या रॅलीत सहभागी झाले हते. यावेळी विविध चौकामध्ये प्रणालीचा मान्यवरांच्या व विविध संस्थेने स्वागत व सत्कार करण्यात आला. पोलीस ठाणे परिसरात वृक्षारोपण करून या रॅलीची सांगता झाली.
सकाळी 9:30 वा. महादेव नगरी चिखलगाव येथून या सायकल रॅलीला सुरुवात झाली. इंडियन गॅस एजन्सी यांच्या वतीने रॅलीचे स्वागत करून चहा, पाणी, नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. साई मंदिर येथे प्रणालीचा सामजिक संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर रॅली लोकमान्य टिळक महाविद्यालयात पोहोचली. यावेळी प्रणालीने विद्यार्थ्यांना सायकल भ्रमंतीचे विविध अनुभव कथन करत पर्यावरण या विषयावर मार्गदर्शन केले. रॅलीत एनसीसीच्या विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. दरम्यान वणीतील पत्रकारांतर्फेही प्रणालीचा सत्कार करण्यात आला.
शहरातील प्रमुख मार्गांनी रॅली काढून पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार, पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के, माया चाटसे इत्यादी मान्यवरांनी प्रणालीचा सत्कार करत तिला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्माईल फाउंडेशन, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट, नगर सेवा समिती, युवा चेतना क्लब, नवरंग क्रीडा मंडळ, उड्डाण फिजिकल करियर अकॅडमी. नि:स्वार्थ सेवा 24 तास ग्रुप, जागरूक नागरिक मंच, एकच ध्येय हात माझा मदतीचा बहुउद्देशीय संस्था, ओबीसी महिला संघटन समन्वय समिती, गुरुदेव सेवा मंडळ, जन कल्याण बहुद्देशीय संस्था, विदर्भ राज्य आंदोलन समिती, बाजीराव वृद्धाश्रम चिखलगाव, अग्रेसर ग्रुप, TSO क्रीडा मंडळ, OBC(VJ NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती, प्रयास ग्रुप, जी.पी.टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन इत्यादी संस्थेचे पदाधिकारी व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.
हे देखील वाचा:
Comments are closed.