भास्कर राऊत, मारेगाव: काम आटोपून आपल्या गावाकडे परत जात असताना तहसील कार्यालयाजवळ एका वाहणाला कुत्रा आडवा आल्याने अपघात घडला. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दि. 24 ऑगस्ट मंगळवारी दुपारी 1 वाजता घडली. विशाल विलास महारातळे (वय 25, रा. सिंधी महागाव) व झित्रू संभा गाडगे (वय 70 रा. बुरांडा ख.) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.
विशाल आणि झित्रू गाडगे हे दोघेही काही कामासाठी मारेगाव येथे आले होते. आपले काम आटोपून आपल्या गावाकडे ते दोघेही जात होते. मारेगाव येथील वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील तहसील कार्यालयाजवळ दुपारी 1 वाजताच्या सुमारास यांच्या दुचाकीला कुत्रा आडवा आला. कुत्रा अचानक मध्ये आल्याने विशालला दुचाकी नियंत्रणात आणणे कठीण झाले. आणि अशातच यांच्या दुचाकीचे नियंत्रण सुटून गाडी कुत्र्याचा अंगावर गेली.
गाडी पडल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना मारेगाव येथील काही लोकांनी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. घटनेचा पुढील पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.
हे देखील वाचा:
महाराष्ट्र बँक जवळील श्रावणी गणेश मॉल येथे भव्य लकी ड्रॉ योजना
वणीत लोढा हॉस्पिटलमध्ये रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकचे थाटात उदघाटन
Comments are closed.