चोरी रोखण्यासाठी गेलेत ते आणि झाले भलतेच अनपेक्षित

घराचे कुलूप तोडून रोख व सोने घेऊन चोर लंपास

विवेक तोटेवार, वणी: चोरांचा सध्या शहरात धुमाकूळ सुरू आहे. अशीच एक चोरी रोखण्यासाठी सामान्य नागरिक सरसावलेत. परंतु भलतेच अनपेक्षित झाले. ही घटना शहरातील फाले ले आऊट येथे 13 मार्च रोजी मध्यरात्री झाली. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातून 24 ग्राम सोने व 65 हजार रूपये रोख लंपास केले. चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमावर हल्ला केला. वणीत नवीन ठाणेदार येताच गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी डोके वर काढण्यास सुरवात केली आहे.

फाले ले आऊट येथे राहणारे स्वप्नील राजू झाडे (29) यांचे ऑटोमोबाईलचे दुकान आहे. ते आपल्या परिवारासह 11 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता आपल्या बहिणीला माहेरी सोडायला चंद्रपूर येथे गेले होते. यावेळी त्यांनी आपला मावसभाऊ रोमल दौलत बोबडे (33) रा. जैन ले आऊट याला घरी झोपवयास सांगितले होते. रोमल हा रात्री उशिरा झोपवयास जायला निघाला. त्याने गेटचे कुलूप उघडले. तोच घरात असलेले दोन चोर बाहेर निघून रोमलला धक्का दिला. हातातील पेचकसने त्याच्यावर हल्ला केला. हल्ल्यात रोमल खाली पडला व तीच संधी साधून चोरटे पळून गेले.

रोमलने त्वरित याची माहिती 112 वर कॉल करून दिली. 13 मार्च रोजी सकाळी रोमल याने फोन करून स्वप्निल याला हकीकत सांगितली. स्वप्निल याने घरी येऊन बघितले असता कपाटाचे लॉक तोडून होते. कपडे व सामान अस्ताव्यस्त होते. कपाटातून 65 हजार रूपये नगदी व 24 ग्राम सोन्याचे दागिने किंमत 1 लाख 80 हजार चोरी झाल्याचे समजले. स्वप्निल यांनी त्वरित पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून वणी पोलिसांत अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 380, 457 भादंवीनुसार गुन्हा नोंद केला. घटनेचा तपास पोउपनी बलराम झाडोकर करीत आहेत.

Comments are closed.