दुचाकी ठेवून मुलाला भेटायला गेले… चोरट्यांचा गाडीवर डल्ला…

अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता बसस्थानक परिसरात उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. दुचाकी मालकाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मो. जलील मो. हबीब शेख रा. पांढरकवडा असे गाडी मालकाचे नाव आहे. ते शुक्रवारी वणीत त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी पांढरकवडा येथून आले होते. त्यांनीआपली दुचाकी (MH29 AX4023) बसस्थानक येथील मंदिराजवळ उभी केली व ते मुलाला भेटण्यास निघून गेले.

मुलाला भेटून ते परत आले तेव्हा त्यांना ठेवलेल्या ठिकाणी गाडी दिसली. आली नाही. याबाबत त्यांनी आजूबाजूला विचारणा केली, परंतु त्यांना गाडी आढळून आली नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांनी तात्काळ वणी पोलीस गाठले व दुचाकी चोरीबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध भादवी कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

गेल्या काही दिवासंपासून वणीत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे दुचाकी चोरणारी टोळी तर परसरात सक्रीय नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देऊन दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.