गुरुपौर्णिमेनिमित्य मारेगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न

शंभरपेक्षा अधिक जणांचे रक्तदान

0

भास्कर राऊत, मारेगाव: गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने साई मित्र परिवार मारेगाव तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन दि. २३ जुलैला सकाळी 10 ते सायंकाळी4 वाजेपर्यंत मारेगाव येथील जगन्नाथ बाबा मंदिर येथे करण्यात आले होते. यामध्ये नागरिकांनी मोठया संख्येने सहभाग नोंदवत 110 रक्तदात्यांनी रक्तदान करीत मोलाचे सहकार्य केले.

साई मित्र परिवार दरवर्षी गुरुपोर्णिमेला वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. हे कार्यक्रम आयोजीत करीत असताना साई मित्र परिवाराचा उत्साह सुद्धा वाखाणण्याजोगा असतो. नेहमी साई मित्र परिवार समाजोपयोगी कार्यक्रम करण्यामध्ये अग्रेसर असतात. मागीलवर्षी कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. तसेच अनेक ठिकाणी रक्तपेढीमध्ये सुद्धा खडखडाट दिसून आला होता. अनेक रुग्ण रक्त न मिळाल्याने त्यांची कशी दाणादाण उडाली होती या सर्व गोष्टींचा अनुभव पाठीशी असलेल्या आणि सामाजिक भान नेहमीच ठेवणाऱ्या या साई भक्तांनी यावर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.

मागील वर्षी कोरोना काळात याच साई भक्तांनी निराधार आणि गरीबांना मोफत अन्नदान केले होते. रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे असे समजून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहनही साई मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते. आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती त्यामुळे रक्तदात्यांच्या संख्येवर याचा परिणाम होईल असे वाटत असतानाच 110 नागरिकांनी रक्तदान केल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. रक्तदात्यांना शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली आहे.

यावेळी विशाल परचाके याने आपला वाढदिवस रक्तदान करून साजरा केला. या रक्तदान शिबीरामध्ये एकूण 110 रक्तदात्यांनी रक्तदान केले. असे समाजोपयोगी उपक्रम साजरे करणाऱ्या साई मित्र परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहेत.

हे देखील वाचा:

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.