मारेगावात उद्या रक्तदान शिबीर

संभाजी ब्रिगेड मारेगाव शाखेचे आयोजन

0

नागेश रायपुरे, मारेगाव: कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना रक्ताची गरज केव्हा पडेल हे सांगता येत नाही. त्याच अनुषंगाने संभाजी ब्रिगेड मारेगाव शाखेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून उद्या दिनांक 14 में रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन येथील नगरपंचायतच्या तळमजल्यावर करण्यात आले आहे.

त्यात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून कोरोनामुळे आलेल्या राष्ट्रीय आपत्ती दूर करण्यासाठी सहकार्य करावे असे संभाजी ब्रिगेडच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. सध्या कोरोना संकटांनी सर्वसामान्य नागरीक त्रस्त असून बाधीत रुग्णांना कधीही रक्ताची गरज भासू शकते.

रक्तपेढीत पहिलेच रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाच्या वतीने गावोगावी रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त

शुक्रवारला सकाळी 10 ते सायं 5 वाजताच्या दरम्यान नगरपंचायत भवन येथे जास्तीत जास्त रक्तदात्यानी रक्तदान करावे. अशी विनंती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, तालुकाध्यक्ष लहू जिवतोडे, कुंदन पारखी, प्रमोद लडके, प्रकाश कोल्हे, राहूल घागी आदींनी केले आहे.

हेदेखील वाचा

विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

हेदेखील वाचा

गांधी चौकातील राधिका साडी सेंटरला ठोकले सील

हेदेखील वाचा

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.