विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

कान्हाळगाव (वाई) येथील घटना

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुका कोरोना विषाणूच्या ग्रहणात असताना तालुक्यात आत्महत्यांचे सत्रसुद्धा थांबता थाबेना. पुन्हा एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील कान्हाळगावं(वाई) येथे घडली. दिलीप रामराव झाडे (45) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार कान्हाळगाव (वाई) येथील रहिवासी असलेले मृतक दिलीप झाडे यांच्याकडे 4 एकर शेतजमीन आहे. मृतक दिलीप झाडे वर सोसायटी, बॅंक व खाजगी कर्ज असल्याने ते गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत असल्याचे नातलगांकडून बोलले जाते.

दरम्यान काल 12 में रोजी 5 वाजता सुमारास मृतक दिलीप झाडे यांनी स्वतःच्या शेतात विष प्राशन केले होते. ते घरी उशिरा परत न आल्याने दिलीपच्या कुटुंबियांनी शेतात जाऊन बघितले असता, दिलीपने विष प्राशन केल्याचे कळताच करंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले.

मात्र उपचार दरम्यान दिलीपची प्राणज्योत मालवली. दिलीपच्या मागे पत्नी, 1 मुलगा 1 मुलगी, आई मोठा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेदेखील वाचा

गांधी चौकातील राधिका साडी सेंटरला ठोकले सील

हेदेखील वाचा

शुल्लक कारणावरून वाद, एकमेकांवर लोखंडी सळई व विटेने हल्ला

हेदेखील वाचा

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

Leave A Reply

Your email address will not be published.