मानवतेच्या सर्वोच्च सेवेसाठी रक्तदान करा.
तीन मित्रांची गरजूंना मदत – एकाच वेळी केलं रक्तदान.
सुशील ओझा, झरी: कुणी रक्त देता का रक्त? रुग्ण नातेवाईकांच्या या केविलवाण्या प्रश्नाने बघणाऱ्यांचं किंवा ऐकणाऱ्यांचं मन हेलावतं. रक्तासाठी मानवाला मानवावरच अवलंबून राहावं लागतं. रक्त तयार करण्याचा ना कुठला कारखाना असतो ना कुठली प्रयोगशाळा, रक्त तयार करण्यासाठी फक्त एकच आश्चर्यजनक कारखाना आहे, तो म्हणजे मानवी शरीर.
मोटिव्हेशन आपल्या जीवनातील चैतन्य आहे. स्वयंप्रेरणाच दीर्घकाळ टिकू शकत असल्याने प्रेरणेचे रूपांतर स्वयंप्रेरणेने होण्यासाठी रक्तदान चळवळीविषयी आस्था बाळगणाऱ्यांनी सातत्याने यासाठी प्रयत्न केले पाहिजे. वर्तमानपत्रात यवतमाळ रक्तपेढीमध्ये अत्यल्प रक्ताचा साठा असल्याचे वृत्त मंगेश शेटे (सेक्शन ऑफिसर, के.व्ही.के., पी.के.व्ही.,यवतमाळ)यांनी वाचले.
लगेच मंगेश यांनी रक्तदान चळवळीविषयी आस्था बाळगणाऱ्यापैकी, एकमेकांचे जिवलग मित्र, जे वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या पदावर सेवा देत आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र येऊन स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याची परंपरा चालवत आहे, यांना रक्तदान करण्यास जाऊ असे सांगितले .
ठरल्याप्रमाणे ते तिघे प्रभाकर रामराव पांडे, (गट विकास अधिकारी, पंचायत समिती, मारेगाव ), अभिजित राऊत, (वरीष्ठ सहायक, जलसंपदा विभाग, यवतमाळ), नीलेश क्षीरसागर,(जी.एस.टी. ऑफीसर, यवतमाळ) यांनी श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी विभाग यवतमाळ येथे स्वैच्छिक रक्तदान केलं. रक्तदान चळवळीचा एक अमूल्य हिस्सा असल्याचा दाखला दिला.
तरुणांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य, रक्तदात्याइतकेच महत्त्व व आवश्यकता रक्तदान प्रबोधनाला आहे. रक्तदान चळवळ सामाजिक स्तरावर अनेक प्रकारे विकसित होणे गरजेचे आहे, यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या प्रफुल्ल भोयरला ह्या तिघांनी मानवतेच्या हितासाठी घेतलेला गौरवास्पद निर्णय एक ऊर्जा देणारा मार्ग ठरेल, यात शंका नाही.
मानवी रक्ताची गरज कधीही न संपणारी असल्याने रक्तदान चळवळीत समाजातील प्रत्येक व्यक्ती अनिवार्य होणे गरजेचे आहे. तुमच्या सामूहिक रक्तदानाने प्रत्येकात रक्तदानाची प्रेरणा चीरकाळ टिकेल.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा