पुस्तकांसारखा जगात दुसरा गुरु नाही – दिकुंडवार

स्माईल फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व पाठ्यपुस्तकांचे वितरण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पुस्तक म्हणजे ज्ञानाचं मोठं भांडार आहे. पुस्तकांसारखा जगात कोणीच दुसरा गुरु नाही, असं प्रतिपादन सामाजिक कार्यात अग्रेसर किरण दिकुंडवार यांनी केलं. स्माईल फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचं वितरण करण्यात आलं. विशेष म्हणजे दिकुंडवार यांनी ही पाठ्यपुस्तकं स्वखर्चानं उपलब्ध करून दिलीत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी भविष्यातही स्माईल फाउंडेशनला मदत करण्याचा शब्द त्यांनी दिला.

स्माईल फाउंडेशनची स्वतःची बूक बँक आहे. या योजनेअंतर्गत पुस्तकांची देवाणघेवाण होते. गरजूंना कपडे वाटप, पुस्तक वाटप, सायकल वाटप, ज्येष्ठांना काठी वाटप असे संस्थेचे उपक्रम सुरूच असतात. संस्थेचे अध्यक्ष सागर जाधव यांनी ज्यांना शक्य असेल त्यांनी जी मदत करता येईल ती करण्याची विनंती केली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणाल आत्राम, आदर्श दाढे, गौरव कोरडे यांनी विशेष परिश्रम घेतलेत. 

Comments are closed.