जितेंद्र कोठारी, वणी: कोवीड 19 या संसर्गजन्य आजाराचे अनुषंगाने लागु असलेल्या लॉकडाउन नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी वणी पोलीस स्टेशन येथे आज 36 जणां विरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला. यात सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणे, सोशल डिस्टनसिंग न ठेवणे, अत्यावश्यक सेवेत समाविष्ट नसताना दुकाने सुरू ठेवुन व्यवसाय करणे, असे एकुण 36 इसमाविरूध्द कलम 188, 269 भा.द.वि. प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागिय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वैभव जाधव, नायब तहसिलदार महेश रामगुंडे, पोउपनि गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे, सुनिल खंडागळे, अशोक टेकाळे यांनी पार पाडली.
अकस्मात कारवाईत तिघे भाजी विक्रेते पॉझिटिव्ह
सध्या प्रशासनाने अकस्मात कारवाई अंतर्गत आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास छ. शिवाजी चौक परिसरातील 75 भाजी विक्रेत्यांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट केली. यात 3 विक्रेते पॉझिटिव्ह आलेत. पॉझिटिव्ह व्यक्तींना होम आयसोलेट करण्यात आले आहे. सध्या 11 वाजेपर्यंतच अत्यावश्यक वस्तूंची खरेदी विक्री करता येत असल्याने छ. शिवाजी चौकात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे खबरदारी म्हणून आज भाजी विक्रेत्यांची टेस्ट घेण्यात आली. दोन दिवसांआधी विनाकारण फिरणा-यांची कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. सदर कारवाई ना. तहसिलदार विवेक पांडे, अशोक ब्राह्मणवाडे यांच्यासह पोलीस विभागाने केली.
विनाकारण घराबाहेर पडल्यास कारवाई – वैभव जाधव
सध्या सुरू असलेल्या कोवीड 19 संसर्गासंबंधाने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही अनावश्यक कारणाने घराबाहेर पडु नये. अत्यावश्यक कारणासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर पाळावे. अत्यावश्यक सेवेव्यतिरीक्त आपले प्रतिष्ठान उघडु नये. तसेच शासनाचे कोवीड 19 संबंधाने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
वैभव जाधव : पोलीस निरीक्षक पो.स्टे. वणी
हे देखील वाचा:
कोरोना विस्फोट, आज तालुक्यात 168 रुग्ण तर 63 व्यक्तींची कोरोनावर मात