संचारबंदीदरम्यान युवासेनेची हेल्पलाईन जाहीर

किराणा, औषधी, गाडीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

0

निकेश जिलठे, वणी: आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाली आहे. त्यानिमित्त वणी शहरातील नागरिकांसाठी आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. यात नागरिकांना हेल्पलाईनवर संपर्क करून औषधी, किराणा, गाडी इत्यादी सुविधा मिळवता येणार आहे.

राज्यात जमावबंदीनंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडण्यासाठी मर्यादा आल्या आहेत. नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन युवासेनेतर्फे एका कॉलवर विविध सेवा पुरवल्या जाणार आहे.

किराणा संदर्भात गरज भासल्यास 8149733710 (शुभम मदन) औषधीची गरज भासल्यास 8999954956 (सौरभ खडसे) या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. तर वृद्ध आणि गर्भवती महिलांना गाडीची मदत लागल्यास 8605181028 (नीलेश करडबुजे) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

घराबाहेर पडू नका, प्रशासनाला सहकार्य करा: विक्रांत चचडा
कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या तरी परिस्थिती आटोक्यात असली तरी ही परिस्थिती आणखी चिघळू शकते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारी म्हणून राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. या काळात अनेकांना किराणा, औषधी तसेच गाडीची गरज भासू शकते. त्यामुळे घराबाहेर न पडता लोकांना थेट मदत मिळावी यासाठी हेल्पलाईन जाहीर करण्यात आली आहे. – विक्रांत चचडा

नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि युवासेवेच्या या सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन वणी युवासेनेतर्फे करण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी ललित जुनेजा (8698908308) सागर मदान (8087899941) ध्रुव येरणे, यश झाम (9011309961) अमित लिचोडे (8083009333) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.