जितेंद्र कोठारी, वणी : कोळशाची अवजड वाहतुकीमुळे साखरा (कोलगाव) ते शिंदोला पर्यंत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या मार्गावर वेकोलिने स्वखर्चाने सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करावा यासाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी सोमवार 31 ऑगस्ट रोजी येनक – येनाडी चौफुलीवर कोळसा वाहतूक रोको आंदोलन केले. वेकोलि व बांधकाम अधिकाऱ्यांशी चर्चा करून मंगळवार पासून रस्त्यावर जीएसबी टाकून व्हॉयब्रेटर रोलरद्वारे दबाई करण्याचे तसेच सिमेंट रोड बांधण्याच्या लेखी आश्वासन नंतर रस्ता रोको आंदोलन वापस घेण्यात आले.
कोळसा वाहतूक रोको आंदोलन दरम्यान साखरा – शिंदोला रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या संख्येत वाहनाची रांगा लागल्या होत्या. कोळसा वाहतुकीमुळे उद्भवणाऱ्या इतर समस्यांबाबतही वेकोलि व प्रशासनिक अधिकाऱ्यांची चर्चा करून लवकर तोडगा काढण्याचे ठरविले. रस्त्यासाठी स्वतः सत्ता पक्षाचे आमदार रस्त्यावर उतरल्यामुळे प्रशासनाचे सर्व अधिकारी आंदोलन स्थळवर हजर होते. वणी येथील उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, पिडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे, वेकोलिचे महाप्रबंधक आभासचंद्र सिंग, परिवहन अधिकारी व शिरपुरचे ठाणेदार गजानन करेवाड यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांच्या पुढाकाराने आयोजित कोळसा रोको आंदोलन मध्ये आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, कृ. ऊ. बा. स. वणीचे उप सभापती विजय गारघाटे, विजय पिदुरकर, दिनकर पावडे, रमेश राजूरकर यांच्यासह मोठ्या संख्येत भाजप कार्यकर्ता व गावातील नागरिक उपस्थित होते.
Comments are closed.