मुख्याध्यापकांच्या विरोधात पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार
शिबला जिल्हा परिषद शाळेतील प्रताप
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शिबला येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक यांच्या कारभारामुळे सन २०२०-२१ या कालावधीचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची तक्रार संतप्त पालकांनी शिक्षणाधिकारी यवतमाळ यांच्याकडे केली आहे.
मार्च २०२० ते २०२१ पर्यंत कोरोनाच्या संक्रमणामुळे विविध उपाययोजना करून शासन ऑफलाईन व ऑनलाईन शिक्षण सुरू होते. ग्रामीण भागात स्वाध्याय उपक्रम, गृहभेटीतून विद्यार्थाना मार्गदर्शन केले जात होते. मार्च २०२० ते मार्च २०२१ पर्यंत शाळेतील एकाही विद्यार्थ्याला ऑफलाईन अथवा ऑनलाईन एकही अक्षर शिकविण्यात आले नाही. शाळेतील एकाही विद्यार्थ्याला शिक्षण मिळत नसल्याचा आरोप करण्यात आले आहे.
लॉकडाऊनपासून तर आजपर्यंत शाळेतील एकाही शिक्षकाने एकाही विद्यार्थ्याच्या घरी भेट दिली नाही. ऑनलाईन शिक्षणाबाबत मुख्याध्यापक यांना विचारणा केल्यास टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात आलीत. शाळेतील एक शिक्षक वगळता एकाही शिक्षकांनी विद्यार्थांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला नाही.
त्यामुळे विद्यार्थी एका वर्षपासून शिक्षणापासून वंचित राहिले. व विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले. याला जवाबदार कोण? असा संतप्त प्रश्न पालकांकडून केला जात आहे. आदिवासी गरीब मुलांना शिक्षणाचा अधिकार नाही का? असा सवाल करण्यात आला आहे.
ऑनलाईन शिक्षणाकरिता दोन चार जणांकडे स्मार्टफोन होते. वर्ग १ ते १० चा अनाकलनीय अभ्यास पाठवत होते. परंतु हा अभ्यास मुलांना समजत नाही. मधल्या काळात वर्ग ५ ते ८ सुरू करण्यात आले होते. परंतु मुख्याध्यापक यांनी एकही वर्ग न शिकवीता वर्ग १ ते ५ शिकविणाऱ्या शिक्षकाकडे सोपवून वर्ग ६,७, व ८ च्या वर्ग शिकविण्याकरिता लावले.
मुख्याध्यापक हे स्वतः कार्यालयात बसून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना विनाकारण त्रास देत असल्याची तक्रार यवतमाळ येथे करण्यात आली. याची चौकशी करून मुख्याध्यापक व शिक्षकांवर कार्यवाही करावी अन्यथा सनदशीर मार्गाने निदर्शने व उपोषण करण्याचा इशारा गजानन इरे, अशोक परताम, तुळशीराम नैताम, प्रमोद मेश्राम, कौशल्या क्षीरसागर, कांती गेडाम, तनवी मेश्राम, संतोषी दुधकोहळे, तन्मय येरमे, श्रेया मडावी, पूर्वा मडावी यांच्यासह इतर अनेकांनी केली आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा