‘मरणे झाले स्वस्त, जगणे झाले महाग’ वणीत काँग्रेसचे अनोखे आंदोलन
पेट्रोल, डिझेल दरवाढ विरोधात कांग्रेस आक्रमक
जितेंद्र कोठारी, वणी: पेट्रोल व डिझेलच्या किमतीती दररोज वाढ होत आहे. पेट्रोलच्या पाठोपाठ आता डिझेलनेही शंभरी पार केली आहे. पेट्रोल डिझेलच्या अतोनात दरवाढी विरोधात शुक्रवार 15 जुलै रोजी कांग्रेस कार्यकर्त्यानी केंद्र सरकार विरुद्द स्वाक्षरी व आक्रोश आंदोलन केले. ‘मरणे झाले स्वस्त, जगणे झाले महाग’, अपयशी मोदी सरकार- जनतेवर करीत आहे अत्याचार’ अश्या प्रकारच्या फलक घेऊन कांग्रेस कार्यकर्त्यांनी येथील लाठीवाला पेट्रोल पंपावर अभिनव आंदोलन केले. या वेळी पेट्रोल पंपावर आपल्या वाहनात पेट्रोल डिझेल भरण्यासाठी आलेल्या वाहन चालकांकडून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ स्वाक्षरी घेण्यात आल्या.
कोरोना काळात अनेकांची नोकऱ्या गेल्या, पगार बंद झाली, व्यवसायही ठप्प पडले. अश्या अवस्थेत मोदी सरकारने पेट्रोल व डीझलच्या किमतीत दररोज वाढ सुरु ठेवली आहे. संकट काळात जनतेला दिलासा देण्याऐवजी सरकार गोर गरीब जनतेच्या जखमेवर मीठ चोळून अत्याचार करीत आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या भाजप सरकारने जनतेची सहनशीलतेचा अंत पाहू नका. असे सांगत कांग्रेस कार्यकर्त्यानी आक्रोश आंदोलन केले.
महागाई व पेट्रोल डिझेलचे दर जो पर्यंत कमी होत नाही तो पर्यंत काँग्रेस पक्ष सोनियाजी गांधी, राहुल गांधी व नाना पटोळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करीत राहील अशा इशारा आंदोलनकारी कार्यकर्त्यानी दिला. यावेळी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अशोक नागभिडकर, तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, शहर प्रमुख प्रमोद निकुरे, वणी विधानसभा उपाध्यक्ष सचिन टाले, सोशल मिडीया प्रमुख प्रदीप खेकारे, शाहीद खान, सुधीर खंडाळकर, प्रमोद ठाकरे, गौरव कुमरे, तनिश खैरे, प्रमोद नित, गणेश अर्के, नागेश डंभारे, वणी तालुका युवक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
हे देखील वाचा: