विविध मागण्यांसाठी मारेगाव कॉंग्रेसचे तहसिलदारांना निवेदन
नागेश रायपुरे,मारेगाव : तालुका कॉंग्रेस कमेटी मारेगावच्या वतीने सुधारित आणेवारी कमी करण्याबाबत व शहरातील महामार्गावर गतिरोधक निर्माण करणे व विविध मागण्याचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यामध्ये सन 2018 चे खरीप हंगामात पाऊस सरसरी तुलनेत 65% पडल्याने अवघ्या तालुक्यातील पिकांची परस्थिती अतिशय नाजुक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कापसाचे उत्तन्न 50% पेक्षाही कमी होणार असल्याचे वास्तव तालुक्याचे आहे.अशा परस्थितीत शासनाने नजर आणेवारी 67 पैसे जाहीर केले. या वर्षी भयंकर दुष्काळाची परस्थिती असल्याने सुधारित आणेवारी कमी करुन दुष्काळ जाहीर करावा. तसेच शहराच्या महामार्गावर गतिरोधक नसल्याने वणी यवतमाळ दिशेने भरधाव वेगात वाहने जात असताना दिवसागणिक अपघाताचे प्रमाण वाढले. यावर बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत मात्र विद्यार्थांना जीव मुठीत घेऊन महामार्ग पार करत शाळेत जावे लागते. त्यामुळे पालकांत चिंतेची बाब निर्माण झाली. करिता तात्काळ महामार्गावर गतिरोधक निर्माण करण्यात यावे आदि मागण्या घेऊन कॉंग्रेसने तहसीलदारांना निवेदन दिले. सात दिवसांत वरील मागण्याची पूर्तता न झाल्यास चक्काजाम आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला.
यावेळी कॉंग्रेसचे नरेंद्र ठाकरे,अरुणा खंडाळकर,अनिल देरकर, शीतल पोटे, शंकर मडावी, गजानन खापणे, शरीफ अहमद, यादव पांडे, उदय रायपुरे, रविन्द्र पोटे, नंदेश्वर आसुटकर आदी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.