वणीत इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

पेट्रोल व डिजलचे दर कमी करण्यासाठी निवेदन

0

जब्बार चीनी, वणी: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती भरमसाठ वाढत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अगोदरच जनता होरपळून निघालेली असताना त्यातच सर्वसामान्यांना इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. वाढलेले पेट्रोल-डिझेलचे दर शासनाने कमी करावेत या मागणीसाठी वणी शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दुपारी 12 वाजता गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकाराच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर उपविभागीय अधिका-यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, जग सध्या कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे. या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले आहेत. उद्योग व्यवसाय अद्यापही पूर्वपदावर आलेले नाहीत. अशा कठीण परिस्थितीत पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने आणखी एक संकट नागरिकांसमोर उभे ठाकले आहे. या दुहेरी संकटाचा सामना करतांना सामान्य जनतेची प्रचंड तारांबळ होत आहे.

7 जून 2020 पासून इंधनाच्या दरात दररोज वाढ केली जात आहे. आतापर्यंत पेट्रोलमध्ये 9 रूपये 12 पैसे, तर डिझेलमध्ये 11 रूपयांची वाढ करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाचे दर निच्चांकावर असतनाही त्याचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्या तेलाच्या किंमती पाहता पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करून सामान्य जनतेला लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनात विवेक माडंवकर, प्रमोद निकुरे, राजाभाऊ पाथ्रडकर, ओम ठाकुर, वंदना धगडी, आशीष कुळसंगे, भास्कर गोरे, विकेश पानघाटे, शाहिदभाई, लक्ष्मण पौन्नलवार, शरद मथंनवार, रफीक रगंरेज, शोभा रांजेणकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.