संविधान सर्व भारतीयांची आचारसंहिता: प्रा.डॉ. अशोक कांबळे
मारेगाव येथे संविधान गौरव दिन कार्यक्रम साजरा
ज्योतिबा पोटे, मारेगाव: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून सर्व भारतियांना संविधानातील तत्वे आचारसंहिता ठरली आहे, तसेच त्या तत्वाचे अनुसरन करुन जीवन सुकर करावे असे प्रतिपादन डॉ. अशोक कांबळे यांनी केले. मारेगाव येथे संविधान दिनानिमित्य भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
संविधान दिनानिमित्त मारेगाव शहरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी १० वाजता शहरातील प्रमुख मार्गावरुन संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभुषा करुन व हातात संविधान घेऊन सर्व नगरवासीयांचे लक्ष वेधले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद गाणार तर प्रमुख अतिथी तहसिलदार विजय साळवे होते. यासोबतच डॉ.सुभाष इंगळे, नगर सेवक ऊदय रायपुरे, भगवान इंगळे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौतम दारुंडे, अजाब गजभीये, राजेंद्र करमनकर, हंसराज कांबळे, राजु दारुंडे, पाझारे सर, संजय जिवने, गजानन चंदनखेडे, गौरव चिकटे, रमेश चिकाटे आणि भारिप कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.