जब्बार चीनी, वणी: कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आता कडक पाऊले उचलली आहेत. अत्यावश्यक दुकाने केवळ सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुली राहतील. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चैन अंतर्गत दि .14 एप्रिल 2021 रोजी रात्री 8 वाजेपासून दि01 में 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंतच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाही बाबत दिलेल्या मार्गदर्शन सूचना लागू करण्यात आल्या आहेत.
या कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आली असतानाही अत्यावश्यक सेवांबरोबर सूट देण्यात देण्यात आलेल्या बाबींच्या कारणांसाठी नागरिक घराबाहेर पडून संचारबंदीचे उल्लंघन करत असल्याने वैद्यकीय सेवा सार्वजनिक वाहतूक, पाणी पुरवठा,
एटीएम, विद्युत व गॅस सिलेंडर पुरवठा आदीच सेवा सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहतील, उर्वरित अत्यावश्यक सेवा आणि सूट देण्यात आलेल्या बाबी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच सुरु राहतील असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी आज येथे जारी केले आहे.
शहरातील आणि जिल्हयातील कोरोनाच्या संसर्गाने वाढणाऱ्या रुग्णांची संख्या आणि जिल्हयात अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली घराबाहेर पडून नागरिक करत असलेली गर्दी यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा