हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून कोरोनाबद्दल जनजागृती

वणीतील कलार समाजाचा स्तुत्य उपक्रम

0

जब्बार चीनी, वणी: वणीतील कलार समाजाकडून हळदी कुंकू करिता महिलांना एकत्रित करुन कोरोनाबद्दल महिलांचे असलेले गैरसमज दूर केले. आपल्या पर्यंत प्रतिबंधक लस आल्यावर नक्की घेण्याचा
निर्धार केला.

हळदी कुंकवाचे निमित्त साधून कलार समाजाच्या महिला एकत्र आल्यात. लीना बडवाईक यांच्या घरी बैठक घेण्यात आली. यावेळी मीनाक्षी बडवाईक, छाया लाड, सविता ठेपाले राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवात लतिका आसटकर यांनी केली. दरवर्षी मोठ्या उत्सहात होणारे हळदी कुंकूला साध्यापध्दतीने कोरोना मुळे घेण्यात येत आहे. अशा वेळी कोरोनाची खबरदारी महिलातील गैरसमज व प्रतीबंधक लस याची माहीत देत हळदी कुंकू घेण्याचा निर्णय केला. या वेळी सविता ठेपाले यांनी महिलांत कोरोनाबद्दल मोठी भीती आहे गैरसमज आहे.

याला दूर करण्यासाठी यावर कसे नियत्रण मिळवायचे, काय काय खबरदारी घ्याची हे पटवून दिले. तसेच प्रतिबंधक लस जी टप्या टप्याने आपल्यापर्यंत येणार आहे. त्या घ्यायच्या आहे हे, आपल्या बोलण्यात पटवून दिले. या वेळी मोठ्या उत्साहात सहभागी होण्याचा निर्णय कलार समाजाच्या वणीच्या महीलानी घेतला. नंतर साध्या पध्दतीने हळदी कुंकूचा कार्यक्रम पार पडला.

हेदेखील वाचा

उद्या वणीतील सर्व दवाखाने बंद

हेदेखील वाचा

तलावात सापडलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली

Leave A Reply

Your email address will not be published.