रविवारी निघालेत 4 पॉजिटिव्ह

शहरात कमी तर ग्रामीण भागात कोरोनाच्या जास्त केसेस

0
Sagar Katpis

जब्बार चीनी, वणी: काल रविवारी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळून आलेत. आलेल्या रुग्णांमध्ये सर्व रुग्ण हे आरटीपीसीआर टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. शहरात कमी तर ग्रामीण भागात कोरोनाच्या अनेक केसेस निघत आहेत.

रविवारी आलेल्या रुग्णांमध्ये मुकुटबन येथे 2 रुग्ण तर गडचांदूर व तेजापूर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तालुक्यात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 759 झाली आहेत. वणी शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात आता कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

रविवारी यवतमाळहून 51 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. त्यात 4 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 47 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. 11 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात सर्व व्यक्ती निगेटिव्ह आलेत. रविवारी कोणत्याही संशयितांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले नाही.

तालुक्यात 68 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 759 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 690 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. रविवारी कोरोना मुक्त झालेल्या 3 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 68 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 53 जण होम आयसोलेट आहेत. 15 जणांवर परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर 12 रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. कोरोनामुळे तालु्क्यात मृत्यूंची संख्या 20 झाली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक

करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!