जब्बार चीनी, वणी: शनिवार पाठोपाठ रविवारीदेखील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. या घटनेने वणी तालुका हादरला आहे. त्यात रविवारी आणखी 3 पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधिंतांच्या मृत्यूमुळे चिंतेत वाढ होत आहे.
रविवारी 17 रॅपीड ऍन्टिजन टेस्ट झाल्यात. रॅपीड टेस्टनुसार 3 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यात. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या 542 झाली आहे. याशिवाय रविवारी 17 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 3 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 14 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. दरम्यान रविवारी 21 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले. तर अद्याप 78 अहवाल येणे बाकी आहे. सध्या तालुक्यात 542 पॉजिटिव्ह व्यक्ती झाल्यात. यातील 415 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 108 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूंची संख्या 18 झाली आहे.
वणीत पुन्हा मृत्यू, हादरला तालुका
रविवारी आलेल्या अहवालानुसार शहरात 3 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेत. वणीतील जैन ले आऊटमध्ये एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. तालुक्यातील बोरगाव येथे 1, भालर येथे 1 तर सुंदरनगर येथे 1 असे 3 कोरोना पॉझिटीव्ह निघालेत.
आज 28 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
रविवारी कोरोनामुक्त झालेल्या 28 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात108 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 61 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 70 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 19 व्यक्तींवर उपचार सुरू आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)