कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला 50 हजारांची मदत
कोव्हिड सानुग्रह अनुदानसाठी मनसे तर्फे मदत केंद्राची स्थापना
जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात कोव्हिड-19 या आजारामुळे निधन झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीमधून प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. हे अनुदान मिळणेकरिता कोव्हिड 19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेईवाईकाने राज्य शासनाने विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. मात्र सानुग्रह अनुदान मिळणेसाठी ऑनलाईन अर्ज कुठून व कसं करावं या बाबत नागरिकांमध्ये अजूनही संभ्रमावस्था आहे.
सानुग्रह अनुदान मिळणेकरीता येणारी अडचण लक्षात घेऊन येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना रुग्ण सेवा केंद्रात 1 नोव्हेंबर पासून मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे. मदत केंद्रावर येणाऱ्या अर्जदारांनी स्वत:चे आधार कार्ड, बँक खाता तपशील, कोविड मृत व्यक्तीचे उपचार तपशील व मृत्यू प्रमाणपत्र तसेच इतर नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र सोबत आणावे असे आवाहन मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी केले आहे.
अधिक महिती करीता संपर्क साधा:
मनसे रूग्ण सेवा केन्द्र वणी,
धनंजय त्रिंबके -9765111933,
आजीत शेख – 9049343999
फाल्गुन गोहोकार- 79725 23629
प्रविण डाहुले- 8975444342
शिवराज पेचे- 9923925255
गितेश वैद्य -9673136160
लक्की सोमकुवर – 9822097154
वैभव पुराणकर -9765360095
संकेत पारखी- 95116 34365
हे देखील वाचा:
Comments are closed.