नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नरसाळा येथे मारेगाव तालुका आरोग्य विभाग व कोरोना दक्षता समिती नरसाळा यांच्यावतीने तपासणी शिबिर झाले. कोवीड १९ अंतर्गत झालेल्या शिबीरात ग्राम पंचायत सभागृहात विलगीकरन कक्षात असलेल्या नागरिकांचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली. दरम्यान गरोदर मातांचीसुध्दा तपासणी करण्यात आली.
या शिबिरात बाहेर गावावरून आलेल्या व गृह विलगीकरन केलेल्या नागरिकांचे स्वॅब घेऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी केलेले सर्वच नागरिकांचे रिपोर्टस निगेटिव्ह आलेत. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे, वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ.केंन्द्र वेगाव डॉ. सतीश कोडापे यांनी कोरोना विषयी मार्गदर्शन केले. शिबिरात बीपी, शुगरवाले व गरोदर मातांना तपासण्यात आले.
या शिबिराला डॉ. एस. जी. कोवे , तलाठी व्ही. एच. थिटे नरसाळा, ग्रामसेवक आर.डब्लू.जनबंधु नरसाळा, आरोग्य सेवक एस. एस. कोल्लुरी, कु. एस. एस. कनाके (ANM),कु. वाय. आर. सलामे (LSO), नेहा मेंगेवार (RBSK.PO), किरण शेंडे (GNM.CCC), सुधा कृष्णा मेश्राम(गट प्रवतर्क), आशासेविका जयश्री भुसारी, मीना राऊत, अंगणवाडीसेविका भारती खाडे, गोपाळ उईके आदी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.