कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगाव येथील नागरिकांची तपासणी

आरोग्यविभागाचा उपक्रम, एकही पॉझिटिव्ह केस नाही

0

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्यविभागाच्या वतीने तालुक्यातील वेगावं येथे शेकडो ग्रामस्थांची रॅपीड टेस्ट करण्यात आली. यामध्ये गरोदर मातांचीही तपासणी करण्यात आली. यावेळी वैधकीय अधिकारी डॉ. सतीश कोडापे यांनी कोरोनाविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

तालुक्यात कोरोनाच प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्यविभागाच्या वतीने विविध उपाय योजना करण्यात येत आहे. सध्या मारेगाव तालुका कोरोनमुक्त आहे. तरी खबरदारी म्हणून आरोग्यविभागाच्या वतीने तालुक्यातील गावागावांत कोरोना अंतर्गत तपासणी शिबिरे घेतली जात आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी 20 ऑगस्टरोजी वेगाव येथील रुग्णालयात शेकडो नागरिकांची रॅपीड टेस्ट करण्यात आली. दरम्यान यामध्ये एकाही व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पोझेटिव्ह आला नाही. सर्व वेगाव येथील ग्रामस्थांचे रिपोर्टस् निगेटिव्ह आलेत.

हे तपासणी शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र वेगावंचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. यावेळी रीता आत्राम, उलमाले, लांबट, उमरे, मेश्राम, आसुटकर, बावणे,आशीष मडावी, अमोल नारले, सुधा मेश्राम, अल्का ताजने, निर्मला ठावरी, थेरे, पिपळकर,आरती तिरणकार, शिल्पा देवरे, योगिता सलामे, आत्राम, किरण शेंडे आदी आरोग्यविभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.