खातेरा व मेंढोली येथे कोरोना टेस्ट कॅम्पचे आयोजन

मेंढोली येथे 257 तर खातेरा येथे 52 व्यक्तींनी केली कोरोना टेस्ट

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील यवतमाळ व चंद्रपूर सीमेवर असलेल्या खातेरा गावात मुकुटबन आरोग्य केंद्राच्या वतीने कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. गावात दोन पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीने कोरोना चाचणी शिबिर घेण्याचा निर्णय घेतला. दिनांक 11 मे रोजी या शिबिराचे आयोजन कऱण्यात आले. यावेळी आरटीपीसीआर व रॅपिड ऍन्टिजन अशा दोन्ही टेस्ट मिळून 72 व्यक्तींच्या टेस्ट घेण्यात आल्या.

कॅम्पच्या यशस्वीतेसाठी सरपंच विशाल ठाकरे, उपसरपंच योगेश मडावी, पुरुषोत्तम वानखडे, प्रा. देविदास गायकवाड, सचिन टाले, पोलीस पाटील राहुल गोडे, जगन्नाथ ताजने, मनोहर ताजने, आशा वर्कर संगीता कुळसंगे, ग्रामसेवक, पटवारी, रविंद्र गोडे, नीलेश उईके , गजानन डायकी व गावकर्‍यांनी सहकार्य केले. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन गेडाम व मुकुटबन आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

मेंढोली येथील कॅम्पला गावक-यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

मेंढोली येथे 257 जणांची कोरोना टेस्ट
शिरपूर: मेंढोली येथे कोरोना चाचणीला स्थानिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी 257 लोकांनी कोरोना चाचणी केली. त्यात 200 जणांची RTPCR टेस्ट करण्यात आली व 57 जणांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. आरोग्य सेवक नितिन खडतकर व आरोग्य परिचारिका नेहा मिसाळ, सरपंच, सचिव आरोग्य सेविका सी पी ढोले, आशा सेविक छाया पिदूरकर, अर्चना नालमवार यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा:

मोहुर्ली व पुरड (नेरड) येथे कोरोनाचे तांडव

कोरंबी (मा.)चे सरपंच विकास भोंगळे यांचे निधन

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.