जब्बार चीनी, वणी: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आजही कायम होती. शनिवारी दिनांक 26 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे तब्बल 17 रुग्ण आढळलेत. यातील 13 रुग्ण हे शहरात तर 4 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. शहरातील तलाव रोडे येथे कोरोनाचे तब्बल 8 रुग्ण आढळून आलेत तर रविनगर येथे 3, शेवाळकर परिसर व गुरुनगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर ग्रामीण भागात गणेशपूर, मुर्धोनी येथे भालर टाऊनशीप, गणेशपूर व चिखलगाव येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.
शनिवारी यवतमाळ येथून 25 रिपोर्ट आलेत. यातील 4 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 21 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज 38 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 13 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर उर्वरित संशयीत निगेटिव्ह आलेत.
तालुक्यात 64 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 1125 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 1036 रुग्ण कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज 13 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली. सध्या तालुक्यात 64 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 29 जण होम आयसोलेट आहेत. 16 जणांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 19 रुग्णांवर यवतमाळ आणि अन्य ठिकाणी उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत तालुक्यात 25 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
हे देखील वाचा:
हे देखील वाचा:
कडाक्याच्या थंडीत शेकोट्यांवर रंगतायेत निवडणुकीच्या गरमागरम चर्चा