मारेगावात कोरोनाचा उद्रेक, आढळलेत 8 पॉझिटिव्ह

व्यवसाय क्षेत्रातील रुग्ण असल्याची माहिती

0

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मारेगाव तालुक्यातही आता कोरोनाच विळखा घट्ट झाला आहे. आरोग्य विभागाला गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरात 8 पॉझिटिव्ह आढळलेत. हे रुग्ण व्यवसाय क्षेत्रातील असल्याची माहिती आहे. अचानक 8 रुग्ण आढळल्याने मारेगावकरांची चिंता वाढली आहे.

प्रशासनाने शहरातील सर्व लहान मोठ्या दुकानदारांना व त्यांच्या कामगारांना कोरोना टेस्ट करणे बंधनकारक केले होते. त्यामुळे शहरातील व्यवसायीकांनी कोरोना टेस्ट केली असता यात 8 पॉझिटिव्ह आढळले आहे. याशिवाय राळेगाव तालुक्यातील खैरी येथील एका महिलेने मारेगाव येथे कोरोना टेस्ट केली असता ती सुद्धा पॉझिटिव्ह आली आहे.

यात शहरातील प्रभाग क्र. 3, 5, 9 व 16 मध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले आहेत तर प्रभाग क्र. 8 व 14 मध्ये प्रत्येकी 2 असे एकूण 8 रुग्ण शहरात आढळून आले आहेत.

हे देखील वाचा:

वणी येथील खासगी कोळसा डेपोंवर पोलिसांची धाड

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.