जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 10 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 30 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 13 तर ग्रामीण भागातील 16 रुग्णांचा समावेश आहे. तर झरी तालुक्यातील एक रुग्ण वणी येथे पॉजिटिव्ह आढळला आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 252 झाली आहे. काल मोहदा येथील एका 62 वर्षीय व्यक्तीचा यवतमाळ येथे कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मृतकांची संख्या आता 27 झाली आहे. (यात बाहेर जिल्ह्यात मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश नाही) दरम्यान आज विकेंड लॉकडाऊन शहरात शंभर टक्के पाळण्यात आला.
शहरामध्ये शास्त्रीनगर येथे 3 रुग्ण आढळले तर भीमनगर येथे 2 रुग्ण आढळले. याशिवाय, अण्णाभाऊ साठे चौक, पंचशील नगर, जनता शाळा. जैन ले आऊट, ग्रामीण रुग्णालय जवळ, वसंत गंगा विहार, साने गुरुजी नगर व तलाव रोड येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. ग्रामीण भागात नांदेपेरा येथे 3 रुग्ण तर निवली, भालर टाऊनशीप, कायर, बोर्डा येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळून आलेत. याशिवाय साधनकर वाडी चिखलगाव, गणेशपूर, सुंदर नगर, राजूर, वेलाबाई येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला. याशिवाय झरी तालुक्यातील एक व्यक्ती वणी येथे पॉजिटिव्ह आला.
आज यवतमाळ येथून 327 अहवाल प्राप्त झाले. यात 10 जण पॉजिटिव्ह आलेत. तर आज 266 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 20 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 97 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 878 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 16 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली
सध्या तालुक्यात 252 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 65 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 146 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 41 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1777 रुग्ण आढळून आलेत. यातील 1498 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 27 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
हे देखील वाचा: