जब्बार चीनी, वणी: वणी येथे कोरोनाचा प्रकोप कमी होताना दिसत असला तरी आता ग्रामीण भागात रुग्ण वाढताना दिसत आहे. आज गुरुवारी दिनांक 13 मे रोजी तालुक्यात 87 रुग्ण आढळलेत. वणी शहरात 19 रुग्ण तर ग्रामीण भागात 63 रुग्ण आढळलेत. ग्रामीण भागात पुरड (नेरड) व मोहुर्ली येथे कोरोनाचे तांडव दिसून आले. पुरड येथे 16 तर मोहुर्ली येथे 17 रुग्ण आढळलेत. ग्रामीण भागात रुग्ण वाढताना दिसत असले तरी अधिकाधिक होणा-या टेस्टमुळे ही संख्या वाढताना दिसत आहे. खेडोपाडी सध्या आरोग्य प्रशासन कॅम्प घेत आहे. अधिकाधिक टेस्टमुळे रुग्णसंख्या जरी वाढताना दिसत असली तरी त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होत आहे. आज देखील प्रशासनाने 600 पेक्षा अधिक संशयीतांचे स्वॅब घेतले आहे. दरम्यान आज 47 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली.
वणी शहरात आलेल्या 19 रुग्णांमध्ये विठ्ठलवाडी येथे सर्वाधिक 3 रुग्ण, वासेकर ले आऊट, प्रगती नगर, माळीपुरा, भीमनगर येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळलेत. तर रंगारीपुरा, जुना कॉटन मार्केट, भगतसिंग चौक, रविनगर, सर्वोदय चौक, अण्णाभाऊ साठे चौक, शाळा क्र, 5 जवळ प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. याशिवाय मारेगाव व झरी तालुक्यातील प्रत्येकी 2 रुग्ण तर राळेगाव येथील 1 रुग्ण वणीत पॉझिटिव्ह आढळला आहे.
तर ग्रामीण भागांत आलेल्या 63 रुग्णांमध्ये मोहुर्ली येथे सर्वाधिक 17 तर पुरड (नेरड) येथे 16 रुग्ण आढळलेत. तर नवरगाव येथे 7 रुग्ण आढललेत. याशिवाय चिखलगाव, गणेशपूर प्रत्येकी 3 रुग्ण आढळलेत. घोन्सा, वांजरी, राजूर कॉलरी येथे प्रत्येकी 2 रुग्ण तर भालर, सावर्ला, पद्मावती नगरी लालगुडा, चनाखा, ब्राह्मणी, साखरा (दरा), कवडशी, कोना, मोहदा, नेरड येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
आज यवतमाळ येथून 582 अहवाल प्राप्त झालेत. यात 77 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 181 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 10 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 605 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 648 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात कोरोनाचे 799 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 64 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 667 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 68 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 4632 रुग्ण आढळून आलेत. यातील 3759 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 73 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.
हे देखील वाचा: