आज मारेगाव तालुक्यात 74 पॉझिटिव्ह, 12 कोरोनामुक्त

ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 452

0

नागेश रायपुरे, मारेगाव: आज गुरुवारी दिनांक 13 में रोजी तालुक्यात  कोरोनाचा प्रकोप दिसून आला. आज तालुक्यात तब्बल 74 पॉझिटिव्ह आढळलेत. तर 12 रुग्णांनी कोरोनावर मात करीत उपचार घेऊन घरी परतले आहे.

आज 275 व्यक्तीचे रॅपीड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 17 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. तर यवतमाळहून आरटिपीसीआर टेस्टच्या प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये 57 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. असे एकूण 74 पॉझिटिव्ह रुग्ण आज तालुक्यात आढळलेत. आज 160 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे पाठवण्यात आले आहे. 

तालुक्यात आता ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 452 वर पोहोचली आहे. यात 25 रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. तर उर्वरित होम आयसोलेशन आहेत. काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

हे देखील वाचा:

मोहुर्ली व पुरड (नेरड) येथे कोरोनाचे तांडव

एलसीबी पथक येणार असल्याची माहिती कुणी दिली?

Leave A Reply

Your email address will not be published.