तालुक्यात ओसरतेय कोरोनाची लाट, रुग्णसंख्येत सातत्याने घट

आज 60 पॉझिटिव्ह, येनक येथे 11 तर भालर येथे 8 रुग्ण

0

जब्बार चीनी, वणी: वणी येथे कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस कमी होत आहे. यात मुख्यत: वणी शहरातील रुग्णसंख्येचा दर झपाट्याने कमी होत आहे. आज शुक्रवारी दिनांक 14 मे रोजी तालुक्यात एकूण 60 रुग्ण आढळलेत. यात वणी शहरात 16 रुग्ण तर ग्रामीण भागात 41 रुग्ण आढळलेत. येनक येथे सर्वाधिक 11 तर भालर येथे 8 रुग्ण आढळलेत. दरम्यान आज 92 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली. गेल्या आठवड्यात शतकी व द्विशतकी जाणारा आकडा या आठवड्यात 100 च्या खाली येत असल्याने तालुक्यात कोरोनाची लाट ओसरण्यास सुरूवात झाली असे म्हणता येऊ शकते. सध्या शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. तर ग्रामीण भागातील रुग्णसंख्येचा दर देखील दिवसेंदिवस कमी होत आहे.

वणी शहरात आलेल्या 16 रुग्णांमध्ये विद्यानगरी येथे सर्वाधिक 3 रुग्ण आढळलेत. तर रविदास नगर येथे 2 रुग्ण आढळले. गुरुनगर, रविनगर, रंगनाथ नगर, प्रगती नगर, विराणी टॉकीज, वसंत गंगा विहार, सिंधी कॉलनी, बुद्ध विहार, भोंगळे ले आऊट, कोंडावार ले आऊट येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.

ग्रामीण भागात आलेल्या 41 रुग्णांमध्ये येनक येथे सर्वाधिक 11 रुग्ण आढळले. याशिवाय भालर येथे 8 रुग्ण आढळले. चिखलगाव येथे 3, बेसा, परमडोह येथे प्रत्येकी 2 तर गणेशपूर, साखरा (दरा), मुर्धोनी, सावर्ला, मोहाडा, सुंदरनगर, तेजापूर, ब्राह्मणी, उमरी, ढुणकी, मंदर, कृष्णानपूर, मेंढोली, भालर कॉलरी, कवडशी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळले. याशिवाय मारेगाव तालुक्यातील 3 व्यक्ती वणीत पॉझिटिव्ह आले.

आज यवतमाळ येथून 460 अहवाल प्राप्त झालेत. यात 49 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 170 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 11 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 666 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 1323 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात कोरोनाचे 767 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 74 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 621 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 72 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 4692 रुग्ण आढळून आलेत. यातील 3851 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 74 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.

हे देखील वाचा:

कोरंबी (मा.)चे सरपंच विकास भोंगळे यांचे निधन

उधारीचे पैसे मागितल्याने युवकाची महिलेस मारहाण

Leave A Reply

Your email address will not be published.