उधारीचे पैसे मागितल्याने युवकाची महिलेस मारहाण

वणीतील खऱबडा भागातील घटना

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातील खडबडा येथे राहणाऱ्या एका युवकाने गुरुवार 13 मे रोजी त्याच ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेस शिवीगाळ करून मारहाण केली. यासह तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपीविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

सुनीता सुरेश पोटदुखे ही महिला वणीतील खरबडा परिसरात राहते. त्यास भागात आरोपी अफसर पठाण (21) राहतो. सुनिताने आरोपीला काही दिवसांआधी 1 हजार रुपये उसनवारी दिले होते. आज सुनिता उधारी परत मागण्यासाठी अफसरच्या घरी गेली होती. परंतु त्यावेळी तो घरी नव्हता. त्यामुळे सुनिताने त्याच्या आईजवळ याबाबत निरोप ठेवला व ती आपल्या घरी परत आली.

दुपारी 12 वाजताच्या सुमारास अफसर हा दारू पिऊन सुनिताच्या घराजवळ आला. त्याने शिवीगाळ करीत सुनीताला मारहाण केली व पुन्हा जर घरी आली तर जीवे मारून टाकेल अशी धमकी दिली. या घटनेनंतर सुनिताने वणी पोलीस ठाणे गाठून आरोपी अफसर याच्याविरोधात तक्रार दिली.

वणी पोलीस ठाण्यात आरोपी अफसर विरुद्ध कलम 294, 323, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास जगदीश बोरणारे करीत आहे.

हे देखील वाचा:

मोहुर्ली व पुरड (नेरड) येथे कोरोनाचे तांडव

एलसीबी पथक येणार असल्याची माहिती कुणी दिली?

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!